बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ इंटरनेटवर तिच्या हॉटनेसने चाहत्यांना भुरळ घालताना दिसत आहे. या अभिनेत्रीने अलीकडेच आपल्या समुद्रकिनारी घालवत असलेल्या सुट्टीचे काही फोटो इंटरनेटवर पोस्ट केले आहेत, ज्यात ती खूपच हॉट स्टाईलमध्ये दिसत आहे. आजकाल इलियाना बीचवर एन्जॉय करत आहे. आणि ती तिचे सुंदर फोटोही आपल्या चाहत्यांसह शेअर करत आहे. इलियानाने तिचा एक अतिशय हॉट यलो बिकीनीवरचा फोटो इंटरनेटवर पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती खूप सेक्सी दिसत होती. (पाहा Ileana D'cruz काय म्हणाली 'सेक्स लाईफ' बद्दल)
येथे इलियाना 'नो मेकअप' लूकमध्ये सूर्याची किरणे अंगावर घेत असताना दिसली होती.अभिनेत्रीचा हा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांची त्या फोटोला पसंती मिळत आहे. इलियाना शेवटची अभिषेक बच्चनच्या विरुद्ध 'द बिग बुल' चित्रपटात दिसली होती. (इलियाना डिक्रुझ हिचा पांढऱ्या बिकीनीतील हा हॉट लूक पाहून थंडीतही फुटेल घाम; पहा फोटो)
अभिनेत्री इलियाना लवकरच 'फेअर अँड लवली' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट समाजातील गोरेपणाबाबत लोकांची मानसिकता प्रस्तुत करतो. चित्रपटाची कथा हरियाणामध्ये शुट करण्यात आली असून रणदीप हूड्डा मुख्य भूमिकेत आहे.