
अनेक बॉलीवूड चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री इलियाना डिक्रुझ (Ileana D'cruz) कायमच सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. अलीकडे तर पागलपंती सिनेमानंतर ती मोठ्या स्क्रीनपेक्षा मोबाईल स्क्रिन वरच अधिक दिसून येत आहे. आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोच्या फीड मध्ये तिने अलीकडेच आणखीन एक कमालीचा फोटो जोडला आहे. इंस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिचा परफेक्ट व्हेकेशन मूड पाहायला मिळत आहे. पांढऱ्या बिकिनीत इलियानाने फ्लॉन्ट केलेली फिट बॉडी म्हणजे फॅन्ससाठी एकाअर्थी न्यू इयर गिफ्टच (New Year Gift) म्हणता येईल. इतकेच कशाला जर जा अजूनही तुम्ही तुमचा नवीन वर्षाचा संकल्प ठरवला नसेल तर हाच आदर्श डोळयासमोर घेऊन स्वतःला फिट ठेवण्याचा निर्धारही तुम्ही करू शकता. पाहा Ileana D'cruz काय म्हणाली 'सेक्स लाईफ' बद्दल
इलियानाने हा फोटो पोस्ट करताना त्याखाली कॅप्शनही थोडे मजेशीर लिहिले आहे. मला यात थोडेफार आकर्षक असल्यासारखे फील होतेय, म्ह्णून मी नंतर हा फोटो डिलीट करणार नाही असे म्हणत इलियानाने पोस्ट केलेल्या या फोटोवर फॅन्सनी खूप कौतुकाने कमेंट्स केल्या आहेत.
इलियाना डिक्रुझ फोटो
वास्तविक इलियानाचा हा फोटो कितीही हॉट असला तरी काही दिवसांपूर्वी तिने टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हंटल्या नुसार आपला लूक सांभाळणे खूप कठीण आणि त्याच वेळी इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी गरजेचे असते असे म्हंटले होते, पण यातही मी एक नॉर्मल व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिक प्रयत्न करते. असेही तिने सांगितले होते.