IIFA Awards 2022: अबुधाबीमध्ये होणार 'आयफा 2022' चे आयोजन; सलमान खान करणार कार्यक्रमाचे होस्टिंग
IIFA Awards 2022 (PC - Twitter)

IIFA Awards 2022: आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कारांची 22 वी आवृत्ती 20 आणि 21 मे रोजी यास बेट, अबूधाबी (Abu Dhabi) येथे सुरू होत आहे. या कार्यक्रमात सलमान खान (Salman Khan), रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि वरुण धवन (Varun Dhawan) यांचा खास परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी सर्व कलाकार उत्सुक आहेत. या इव्हेंटसाठी सलमान त्याच्या आवडत्या डेस्टिनेशन यास बेटावर येण्यास उत्सुक आहे.

यासंदर्भात बोलताना सलमान म्हणाला की, “आयफा कार्यक्रमाचा एक भाग बनण्याने खूप छान वाटत आहे. मी यास आयलंड, अबू धाबी येथे 22 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. ते माझ्या वैयक्तिक आवडींपैकी एक आहे. मला खात्री आहे की जगभरातील चाहते आपल्याइतकेचं उत्साहित आहेत. ते भारतीय चित्रपट जागतिक स्तरावर साजरा करणाऱ्या या मेगा इव्हेंटची प्रतीक्षा करू शकत नाहीत. हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टता साजरी करण्यासाठी दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कार्यक्रम संपूर्ण समुदायाला एकत्र आणेल." (वाचा - Attack Part 1 Trailer Out: John Abraham च्या 'अटॅक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; Watch Video)

दरम्यान, रितेश देशमुख सलमानसोबत या मेगा-इव्हेंटचे सह-होस्टिंग करणार आहे. तो या कार्यक्रमाची वाट पाहत आहे. रितेश यासंदर्भात बोलताना म्हणाला, “IIFA 2022 च्या 22 व्या आवृत्तीचा भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. हे आणखीचं विशेष आहे कारण, आम्ही या भव्य सोहळ्यासाठी खूप प्रतीक्षा केली आहे. मी सलमान खानसोबत सह-होस्टिंग करण्यास उत्सुक आहे.”

दरम्यान, परफॉर्म करण्यासाठी सज्ज झालेला अभिनेतता वरुण धवन म्हणाला, “आयफामध्ये परफॉर्म करणे नेहमीचं खूप आनंददायी असते. महामारीच्या काळात आपण सर्वांनी आयफा मिस केला. आता यावर्षी तो मोठ्या उत्साहात साजरा होईल. त्याचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे. यास आयलंड, अबु धाबी येथे आयफा पुरस्कारांच्या 22 व्या आवृत्तीत सहभागी होण्यास मी उत्सूक आहे.”