Attack Part 1 Trailer Out: John Abraham च्या 'अटॅक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; Watch Video
Attack Part 1 Trailer Out (PC - Instagram)

Attack Part 1 Trailer Out: बॉलिवुड अभिनेता John Abraham चा 'अटॅक पार्ट 1' (Attack Part-1) चा बहुप्रतिक्षित ट्रेलर आज, 7 मार्च रोजी रिलीज झाला. जॉन अब्राहम या चित्रपटाद्वारे भारताचा पहिला सुपर सैनिक म्हणून तुमचे मन जिंकायला तयार आहे. लक्ष्य राज आनंद (Lakshya Raj Anand) दिग्दर्शित, अटॅक पार्ट 1 मध्ये जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) यांच्याही भूमिका आहेत. अटॅक हा खऱ्या घटनांपासून प्रेरित एक अॅक्शन थ्रिलर आहे.

अटॅक पार्ट 1 चा ट्रेलर शेअर करताना जॉन अब्राहमने लिहिले, “भारताचा पहिला सुपर सोल्जर देशाला वाचवण्यासाठी आला आहे! #ATTACKtrailer out now #Attack - Part 1. 1 एप्रिल 2022 रोजी जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे." (वाचा - Jhund: केदार शिंदे यांचं 'झुंड'विषयीचं ट्विट चर्चेत, प्रक्षेकांना झुंड चित्रपट पाहण्याचे केले आव्हाण)

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

पेन स्टुडिओचे जयंतीलाल गाडा, जॉन अब्राहम आणि अजय कपूर यांनी अटॅकची निर्मिती केली आहे. अटॅक व्यतिरिक्त जॉन अब्राहम लवकरच मोहित सुरीच्या 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांच्याही भूमिका आहेत.