Hrithik Roshan आणि Deepika Padukone यांची प्रमुख भूमिका असलेला 'Fighter' चित्रपटाचा टीजर आला समोर, 'ही' आहे प्रदर्शनाची तारीख
Deepika Padukone And Hrithik Roshan Fighter Movie Teaser (Photo Credits: Instagram)

ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही जोडी ऑनस्क्रीन पाहण्यासाठी अनेक चाहते उत्सुक होते. त्यांची ही उत्सुकता आता संपली असून लवकरच या दोघांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आज ऋतिक रोशन च्या वाढदिवसादिवशी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला. 'फायटर' (Fighter) असे या चित्रपटाचे नाव असून सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे निर्माते आहेत. याआधी सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांनी ऋतिक रोशनसह बँग बँग आणि वॉर चित्रपटासाठी काम केले आहे. यामुळे ऋतिक रोशननेही सिद्धार्थ आनंद यांचा उल्लेख एक सोशल मिडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

ऋतिक लिहितो, "अभिनेता म्हणून मला Fighter या चित्रपटाचा भाग बनविल्यामुळे मी ममता आणि सिद आनंद यांचे आभार व्यक्त करतो. मला या चित्रपटाचा भाग बनून अतिशय आनंद होत आहे. हे खूपच खास आहे. कारण याने एक दिग्दर्शक आणि मित्रासह माझे नाते आणखी घट्ट केले आहे. ज्यांचा प्रवास एक सहाय्यक दिग्दर्शकापासून बँग बँग आणि वॉर मध्ये मला डायरेक्टपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. आता ते फायटरचे निर्माते झाले आहेत. त्यामुळे माझ्या आनंदाला सीमा उरलेली नाही. धन्यवाद, सिद माझ्यावर एवढा विश्वास दाखवल्याबद्दल आणि पुन्हा एकदा मला तुझा सहयात्री बनविल्याबद्दल जेथे आपल्याला उंच झेप घ्यायची आहे."हेदेखील वाचा- Hrithik Roshan's 47th Birthday: हृतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त पूर्व पत्नी सुझान खान ने संस्मरणीय आठवणींचा व्हिडिओ शेअर करत दिल्या खास शुभेच्छा; पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

ऋतिक मागे सिद्धार्थसोबत केलेला चित्रपट वॉरने 300 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. त्यामुळे या चित्रपटाकडून चाहत्यांप्रमाणे ऋतिकला हा ब-याच अपेक्षा आहेत. ही जोडी पुन्हा एकदा हायटेक अॅक्शन सीन्ससह आपल्या समोर येणार आहेत. हॉलिवूड चित्रपट xXx: Return of Xander Cage मध्ये जबरदस्त अॅक्शन सीन देणारी दीपिका पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून आपले अॅक्शन सीन्स दाखवण्यास सज्ज आहे.

दीपिकाने देखील आपल्या सोशल मिडियावर या सिनेमाचा टीजर पोस्ट करुन त्याखाली स्वप्ने खरीच पूर्ण होतात असे कॅप्शन दिले आहे.