Hrithik Roshan's 47th Birthday: हृतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त पूर्व पत्नी सुझान खान ने संस्मरणीय आठवणींचा व्हिडिओ शेअर करत दिल्या खास शुभेच्छा; पहा व्हिडिओ
आज हृतिकच्या वाढदिवशी त्याची एक्स पत्नी सुझान खाननेही सोशल मीडियावर खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. सुझानने आपला मुलगा रिहान रोशन आणि ह्रिधान रोशन यांचा हृतिकसह एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Hrithik Roshan's 47th Birthday: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचा आज 47 वा वाढदिवस आहे. हृतिकच्या वाढदिवसाबद्दल त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. हृतिकच्या अनेक चाहत्याने सोशल मीडियावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हृतिकने आपल्या शानदार अॅक्शन, नृत्य आणि चित्तथरारक व्यक्तिमत्त्वामुळे लाखो लोकांची मने जिंकली आहेत. वयाच्या 47 व्या वर्षीही तो आपल्या तंदुरुस्तीने आणि हॅडसम लुकमुळे तरुणांना आव्हान देताना दिसत आहे.
आज हृतिकच्या वाढदिवशी त्याची एक्स पत्नी सुझान खाननेही सोशल मीडियावर खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. सुझानने आपला मुलगा रिहान रोशन (Hrehaan Roshan) आणि ह्रिधान रोशन (Hridhaan Roshan) यांचा हृतिकसह एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुझानने हृतिक आणि त्याच्या मुलांच्या सुट्टीचा हा अविस्मरणीय व्हिडिओ एकत्रीत केला आहे. हा गोड आठवणींचा व्हिडिओ तिने हृतिकला डॅडीकेट केला आहे. (वाचा - Hrithik Roshan Turns 47: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन ला आपले 11 वे बोट कापायचे होते; मात्र 'या' कारणामुळे नाही केली शस्त्रक्रिया)
हा व्हिडिओ पोस्ट करताना सुझानने लिहिलं आहे की, "हॅप्पी बर्थडे हृतिक...वाढदिवसाच्या शुभेच्छा... तुला आणखी खूपचं सुंदर क्षण पाहायचे आहेत. 2021 वर्ष तुझ्यासाठी आशीर्वाद आणि आर्थिक परिपूर्ण असो." 2014 मध्ये हृतिक आणि सुझानने एकमेकांना घटस्फोट दिला होता. (Drugs Case: Dia Mirza ची माजी मॅनेजर Rahila Furniturewala सह 3 जणांना NCB कडून 200 किलो गांजा प्रकरणी अटक)
View this post on Instagram
दरम्यान, विभक्त झाल्यानंतर बर्याच वर्षानंतरही हे दोघे नेहमीचं एकमेकांसाठी हजर असतात. सुझान देखील रोशन परिवाराच्या प्रत्येक कार्यक्रमात हजर असते. रोशन कुटुंब आणि सुझान मिळून आपल्या मुलांची देखभाल करतात. घटस्फोट घेऊनदेखील हृतिक आणि सुझानमध्ये आजही मैत्रिपूर्ण संबंध कायम आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2021 11:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

