Drugs Case: Dia Mirza ची माजी मॅनेजर Rahila Furniturewala सह 3 जणांना NCB कडून 200 किलो गांजा प्रकरणी अटक
दिया मिर्जा (Photo Credits: Instagram)

Drugs Case: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने (Narcotics Control Bureau) मुंबईच्या वांद्रे भागात मोठी कारवाई करत 2 भारतीय आणि 2 ब्रिटीश नागरिकांना गांजासह अटक केली. वांद्रे येथे एका कुरिअरमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा सापडला. त्यानंतर कारवाई करत या आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेल्या 2 भारतीयांपैकी एकजण बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाची माजी सेलिब्रिटी मॅनेजर राहीला फर्निचरवाला (Rahila Furniturewala) आणि दुसरी व्यक्ती तिची बहीण शाइस्ता आहे.

डीएनएच्या अहवालानुसार एनसीबीने निवेदन जारी केले आहे की, त्यांना मिळालेल्या माहितीनंतर वांद्रे पश्चिम येथील जसवंत हाइट्स येथे राहणाऱ्या करण सजानी याच्याकडून त्यांनी बराच गांजा जप्त केला. पुढील तपासणीत राहिलाकडून गांजाच्या बड्स सापडल्या. यासह, शाइस्ताकडून गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत एनसीबीने एकूण 200 किलो गांजा जप्त गेला आहे. (वाचा -Hrithik Roshan Turns 47: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन ला आपले 11 वे बोट कापायचे होते; मात्र 'या' कारणामुळे नाही केली शस्त्रक्रिया)

दरम्यान, हा गांजा मुंबईतील हाय प्रोफाइल ग्राहकांना पाठविण्यात येत होता. यासाठी शाइस्ता आणि रहिलाही त्यांची मदत करत असतं. शनिवारी एनसीबीने सुशांतसिंग राजपूत यांचा फरार मित्र ऋषिकेश पवार याला शोधून काढले. अनेक समन्स पाठवूनही तो चौकशीसाठी हजर राहिला नव्हता. (Remo D'Souza हार्ट सर्जरी नंतर पहिल्यादाचं पोहोचले जीम; दमदार वापसीचा व्हिडिओ पाहून चाहते झाले खूश)

सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यू प्रकरणी एनसीबीने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची चौकशी केली आहे. तसेच ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अनेकांना अटक केली आहे. एनसीबीने अलिकडेच ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जून रामपाल आणि त्याच्या बहिणीला समन्स पाठवले होते.