रेमो डिसूजा (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा (Remo D'Souza) यांना गेल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तात्काळ कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करावे लागले. तथापि, आता रेमोची तब्येत वेगाने सुधारली आहे. रेमोने स्वत: ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये वर्कआउट करण्यास सुरुवात केली आहे. रेमोने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रेमो हातात डंबल उंचावून व्यायाम करत असल्याचे दिसून येत आहे.

रेमो डिसोझाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रेमो बाइसेप्स मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रेमोने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "वापसी नेहमी सेटबॅकपेक्षा मजबूत असते. आजचं सुरु झालं आहे. हळूहळू पण नेहमीसाठी. " रेमोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे. रेमोचे बरेच चाहते कमेंट करून रेमोचे कौतुक करत आहेत. आतापर्यंत 1 लाख 60 हजाराहून अधिक लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे. (वाचा - Bhandara Tragedy: भंडारा आग दुर्घटनेवर रितेश देशमुख, जेनेलिया डिसूजा यांनी व्यक्त केली हळहळ (View Tweets))

 

View this post on Instagram

 

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रेमोने बॉलिवूडमध्ये पार्श्वभूमी डान्सर म्हणून सुरुवात केली. त्यानंतर रेमोने बर्‍याच चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शनही केले. रेमोने 'फ़ालतू' चित्रपटाद्वारे दिग्दर्शन केले आणि त्यानंतर त्यांनी 'एबीसीडी', 'एबीसीडी 2' आणि सलमान खान स्टारर फिल्म 'रेस' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.