Bhandara Tragedy: भंडारा आग दुर्घटनेवर रितेश देशमुख, जेनेलिया डिसूजा यांनी व्यक्त केली हळहळ (View Tweets)
Riteish Deshmukh, Genelia Deshmukh Reaction on Bhandara Tragedy (Photo Credits: Instagram, Twitter & ANI)

राज्यातील भंडारा (Bhandara) जिह्यात घडलेल्या आग दुर्घटनेवरुन राज्यासह देशभरात दु:ख व्यक्त केलं जात आहे.  शुक्रवारी मध्यरात्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला (Bhandara District General Hospital) लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला तर 7 जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. हे वृत्त अत्यंत हृदयद्रावक असून या दुर्घटनेवर सर्वच स्तरातून प्रतिक्रीया उमटत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी व अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.

अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. अत्यंत दु:खद. कोणत्याच पालकांना हे दु:ख पाहायला लागू नये. ज्यांनी आपले बाळ गमावले आहे. त्या सर्व कुटुंबियांना सामर्थ्य मिळो. माझी प्रार्थना त्यांच्यासोबत आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची गरज आहे. निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्यास दोषींवर शिक्षा व्हायला हवी."

रितेश देशमुख ट्विट:

जेनेलिया देशमुख ट्विट:

जेनेलियाने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले की, "हे हृदय पिळवटून टाकणारे आहे. अत्यंत दु:खद."

आगीत मृत पावलेल्या बालकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  देखील या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.