Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राला (Maharashtra) हादरुन टाकणारी घटना शुक्रवारी मध्यरात्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात (Bhandara District General Hospital) घडली. रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले आहे. दुर्घटनेची सखोल चौकशी करुन कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

शुक्रवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सिक न्यू बॉन केअर युनिट ला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा दुर्दैवी अंत झाला. तर 7 बालकांचे प्राण वाचवण्यात यश आले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. (Fire at Bhandara District Hospital: भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री विश्वजित कदम, अमित शाह, राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या भावना)

ANI Tweet:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी संवाद साधून तात्काळ तपासाचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे. तर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.