बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) पती निक जोनस (Nick Joans) सह भारतात आली होती. होळीनिमित्त अंबानी हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत प्रियंकाने पती निक जोनससह भरपूर धमाल केली. या धमाल पार्टीचे फोटोजही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले. या पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती. या पार्टीनंतर आता प्रियंका आणि निकचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात प्रियंका आणि निक त्यांच्या नातेवाईक आणि खास मित्रमंडळींसह भांग एन्जॉय करताना दिसत आहेत. यात प्रियंका आपल्या मैत्रिणींसह तर निक प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ सोबत दिसत आहे. होळी निमित्त प्रियंका-निकने भांगेचा आस्वाद घेतला आहे.
होळी सेलिब्रेशननंतर प्रियंका-निक अमेरिकेसाठी रवाना झाले आहेत. दोघांनाही काल रात्री एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. (Holi 2020: प्रियांका चोप्रा, निक जोनस, विकी कौशल, कतरीना सहित 'या' कलाकारांचे अंबानी हाऊस मध्ये होळी सेलिब्रेशन; पहा फोटो)
पहा प्रियंका-निक यांचा हा खास व्हिडिओ:
View this post on Instagram
अलिकडेच प्रियंका चोप्राचा 'स्काई इज पिंक' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र तो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. या सिनेमात प्रियंकासह फरहान अख्तर देखील झळकला होता. आता लवकरच प्रियंका वेबसिरीज 'द व्हाईट टायगर' मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. यात प्रियंकासोबत राजकुमार राव याची प्रमुख भूमिका आहे.