भारताची कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी पार पडावी म्हणून सर्व दिग्गज आणि उच्चभ्रू व्यक्ती आपापल्या परीने जमेल ती मदत करत आहेत. यात आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सने या कोरोनाच्या लढाईत महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यात आता ज्येष्ठ अभिनेत्री तसेच भाजप नेत्या हेमा मालिनी (Hema Malini) यांनी देखील कोरोना रुग्णांना मदत केली आहे. त्यांनी मथुरेमध्ये 7 ऑक्सिजन एनहान्सर मशीन्स लावल्या आहेत. त्यांच्या या पुढाकारामुळे येथील नागरिकांना तसेच कोरोना बाधित रुग्णांना फायदा होईल.
कोरोना काळात देशवासियांच्या मदतीसाठी हेमा मालिनी यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हेमा मालिनी यांनी ट्विटरवर फोटोज शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.हेदेखील वाचा- बाबो! अभिनेता Sonu Sood कडे एका दिवसात तब्बल 41,660 लोकांनी मागितली मदत; अभिनेता म्हणाला- 'सर्वांपर्यंत पोहोचण्यास 14 वर्षे लागतील'
ब्रज वासियों की सेवा के लिए जनपद मथुरा में 7oxygen Enhancerमशीन स्थापित करवा कर मैं अपने आप को धन्य महसूस कर रही हूं।शीघ्र ही जनपद मथुरा में और oxygen Enhancer मशीन ग्रामीण क्षेत्र के ब्रज वासियों के लिए समर्पित कर रही हूँ।इस तरह जनपद में लगभग 60 oxygen Bed और उपलब्ध हो जाएंगे। pic.twitter.com/aeuo6wNZTL
— Hema Malini (@dreamgirlhema) May 19, 2021
"ब्रजवासियांचया सेवेसाठी जनपद मथुरेमध्ये 7 ऑक्सिजन एनहान्सर मशीन लावण्यात आले आहेत. हे काम करुन मला खूप धन्य झाल्यासारखे वाटत आहे. लवकरच मथुरा आणि ग्रामीण भागातील ब्रजवासियांना या सेवा कार्यरत होतील. यामुळे जवळपास 60 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होतील." असे हेमा मालिनी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान सलमान खान, सोनू सूद, अनुष्का शर्मा, विराट कोहली, अमिताभ बच्चन, रोहित शेट्टी, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, तापसी पन्नू, कैटरीना कैफ सारख्या अनेक दिग्गजांनी कोविड काळात महत्त्वाची मदत केली आहे.