Anurag Kashyap Birthday: 'हॅप्पी बर्थडे चरसी अनुराग' म्हणत ट्विटर युजरने सुरु केलं ट्रेंड, अनुराग कश्यप ने दिलं त्याहुनही मजेशीर उत्तर
Anurag Kashyap (Photo Credits: Instagram)

Happy Birthday Anurag Kashyap: बॉलिवूड मध्ये खर्‍या अर्थाने गॅंंगवॉर्स दाखवण्याचा ट्रेंड सुरु केलेल्या फिल्ममेकर अनुराग कश्यपचा आज वाढदिवस आहे. सेलेब्रिटींंचा वाढदिवस म्हंंटला की त्यांंचे फोटो शेअर करुन अनेकदा फॅन्स मंंडळी ऑनलाईन शुभेच्छांंचा वर्षाव करत असतात, तसाच वर्षाव अनुराग वर सुद्धा होत आहे. मात्र शुभेच्छांंपेक्षा सुद्धा अनुरागला हटके पद्धतीने विश करणारं एक हॅशटॅग ट्विटरला ट्रेंड होत आहे. #हॅप्पी बर्थडे चरसी अनुराग (#HappyBirthdayCharsiAnurag) असे म्हणत काही युजर्सनी मजेशीर ट्विटस केले आहेत, अर्थात अनुरागचा इतर वेळचा राऊडी अवतार पाहता यावरुन तो भडकुन चिडुन उत्तर देईल किंंवा थेट इग्नोर करेल अशी शक्यता होती पण याउलट अनुरागने जे मजेशीर उत्तर दिले आहे ते बघुन तुम्हीही नक्की हसाल..

तर झालंं असं की अनुरागच्या वाढदिवसाच्या निमित्त सोशल मीडियावरील मीमर्स, ट्रोलर्सने (#HappyBirthdayCharsiAnurag) म्हणत ट्विट करायला सुरुवात केली ज्याची तात्काळ दखल घेत अनुरागने रिप्लाय केला की, "उफ! इतकं चरसी प्रेम...तुम्ही सगळे शुद्धीत असताना पण असंच प्रेम केलंं असतंं तर..असो #हॅप्पी बर्थडे चरसी अनुराग साठी सर्वांंचे आभार." आता इथवरच ही मंंडळी थांंबली नाहीत तर पुढे अनुरागच्या या ट्विटवर कमेंंट्स करुन पण हा सगळा मीम्स शुभेच्छा वजा ट्रोल्सचा प्रकार सुरुच आहे.पहा यातील काही निवडक ट्विट्स

अनुराग कश्यप Birthday Tweet

दरम्यान, अनुराग हा बर्‍याच राजकीय, सामाजिक, धार्मिक मुद्द्यांवरुन आपलं मत सोशल मीडियावर मांंडत असतो त्यावरुन अनेकदा याआधी ट्रोल झाला आहे पण तरीही बिनधास्त सेलिब्रिटी म्हणुन आपली ओळख बनवत तो आपली परखड मतं मांंडतच असतो, या मतांंचं माहित नाही पण अनुराग च्या रिअ‍ॅलिटी वर आधारित सिनेमांंचे मात्र आजही बरेच फॅन्स आहेत, त्या सगळ्या फॅन्सच्या वतीने हॅप्पी बर्थडे टु यु अनुराग!