Happy Ganeshotsav 2020 (Photo Credits: File Image)

गणेश चतुर्थीचा सण आज संपूर्ण देशभरात अगदी उत्साहात साजरा केला जाईल. गणपती बाप्पाचे आगमन, पूजा, आरती याची लगबग सर्वत्र सुरु असेल. कोविड-19 संकाटामुळे यंदाचा गणेशोत्सव अगदी साध्या स्वरुपात साजरा केला जाणार आहे. तरी देखील सणाच्या उत्साहात कोणतीही कमी जाणवत नाही. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीही गणरायाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण वातावरण बाप्पामय झाले आहे. दरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अजय देवगन (Ajay Devgn), फरान अख्तर (Farhan Akhtar), काजोल (Kajol) यांच्यासह अनेक कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (गणेश गल्लीच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी YouTube, Facebook च्या या लिंकवर करा आणि घरबसल्या पहा रूप)

अमिताभ बच्चन:

महानायक अमिताभ बच्चन यांनी लालबागच्या राजाचा जुना फोटो शेअर करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अजय देवगन:

 

View this post on Instagram

 

Ganpati Bappa Morya 🙏 #HappyGaneshChaturthi

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

फरहान अख्तर:

अक्षय कुमार:

माधुरी दीक्षित:

काजोल:

हेमा मालिनी:

सलमान खान, शिल्पा शेट्टी कुंद्रा, हृतिक रोशन, माधुरी दीक्षित या सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन होते. त्याचीही धूम आपण दरवर्षी अनुभवतो. मात्र यंदा साध्या स्वरुपातील सेलिब्रिटींच्या बाप्पाचे दर्शन होणार आहे.

यंदा गणेशोत्सवावर कोरोना व्हायरसचे सावट असल्याने सण साजरा करण्यावर अनेक बंधने आली आहेत. अनेक गणपती मंडळांनी गणेशोत्सव रद्द करत आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेक मंदिरात ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. घरगुती गणेशोत्सवही अत्यंत साध्या स्वरुपात साजरा होणार आहे.