बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर कॅन्सरमुक्त, दिग्दर्शक राहुल रावेल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला खुलासा
Rishi Kapoor and Rahul Rawail (Photo Credits-Facebook)

बॉलिवूड मधील जेष्ठ अभिनेते ऋषी  कपूर (Rishi Kapoor) हे गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्क (New York) येथे राहतायत. तसेच त्यांच्यावर न्यूयॉर्क येथे वैद्यकीय उपचार सुरु होते. मात्र नेमका कोणत्या आजारावर उपाचार सुरु होता याबद्दल स्पष्टपणे कधीच सांगितले गेले नाही. परंतु ऋषी कपूर यांना कॅन्सर (Cancer) असल्याची चर्चा केली जात होती. तर आज ऋषी कपूर हे कॅन्सरमुक्त असल्याचा खुलासा त्यांचे मित्र आणि दिग्दर्शक राहुल रावेल (Rahul Rawail)यांनी सांगितले आहे.

राहुल रावेल यांनी फेसबुकच्या माध्यमातून ऋषी कपूर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये ऋषी कपूर यांना असलेला कॅन्सर पूर्णपणे बरा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.(बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बाबू यांच्या जीवनावर बायोपिक; उलगडणार वादग्रस्त आयुष्य)

तर कपूर कुटुंबियसुद्धा नेहमीच ऋषी कपूर यांच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियावर माहिती देत असतात. तसेच उपचारादरम्यानच्या स्थितीचे वर्णन करत ऋषी कपूर यांनी ते ठिक असल्याची माहिती दिली होती.