इंडियन आयडल 11 च्या TRP साठी पसरवल्या नेहा कक्कड आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाच्या खोट्या बातम्या; उदित नारायण यांचा धक्कादायक खुलासा
Neha Kakkar, Aditya Narayan (Photo Credits: Instagram)

प्रसिद्ध गायिका आणि इंडियन आयडल 11 (Indian Idol 11) ची जज नेहा कक्कड़ (Neha Kakkar) आणि शो होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) यांच्या लग्नाच्या बातम्या, गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. बातमीनुसार, 14 फेब्रुवारीला दोघे लग्न करणार आहेत. पण त्याआधी आदित्यचे वडील म्हणजेच बॉलिवूड गायक उदित नारायण (Udit Narayan) यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे, या दोघांचे लग्न होणार नसल्याचे उदित नारायण यांनी सांगितले आहे.

उदित नारायण यांनी एका मुलाखती दरम्यान याचा खुलासा केला. ते म्हणाले, 'आदित्य आमचा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या लग्नाच्या अफवा खऱ्या ठरल्या असत्या, तर मी व माझी पत्नी खुश झालो असतो. मात्र आदित्यने आम्हाला याबद्दल काहीही सांगितले नाही.'

ते पुढे म्हणतात, 'मला वाटते की नेहा आणि आदित्यच्या लग्नाच्या बातम्या, या दोघांचा शो इंडियन आयडल 11 ची टीआरपी वाढविण्यासाठी पसरवल्या जात आहेत. नेहा खूप चांगली मुलगी आहे, आम्हाला ती खूप आवडते. आम्हाला तिला आमची सून म्हणून पहायला आवडेल.' (हेही वाचा: नेहा कक्कर आणि आदित्य नारायण करणार 'या' तारखेला लग्न; Details Inside)

यासोबतच उदित नारायण यांनी माध्यमांना आणि चाहत्यांनाही असे आश्वासन दिले की, जेव्हा त्याचा मुलगा लग्न करेल तेव्हा ते आनंदाने ही माहिती सर्वांना देतील. दरम्यान, नेहा काकड हिचे ब्रेकअप झाल्यावर तिचे व आदित्य नारायणचे नाव जोडले गेले होते. असे म्हटले जात होते की, नेहा आणि आदित्य या व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहेत. मात्र आता या बातम्यांवर पूर्णतः पडदा पडला आहे. व हे लक्षात आले आहे की फक्त एका शोच्या टीआरपीच्या साठी कोणत्याही प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवू शकतात.