Jawan Poster (PC - wikipedia.org)

Jawan Box Office collection day 2: बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानच्या जवान या चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाची  जगभरात क्रेझ वाढत चालली आहे. पहिल्या दोन दिवसांत जवानाचे जगभरात काय कलेक्शन होते, ते जाणून घ्या

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची जादू जगभर पसरली आहे. या चित्रपटाने जगभरात उत्कृष्ट कलेक्शन केले आहे. शाहरुख खानचे देशभरात लाखो चाहते आहे. 'जवान'च्या पहिल्या दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 129.60 कोटींची कमाई केली होती. यासह जवान हा भारतातील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. शाहरुख खान साठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड रिपोर्टनुसार, जवानने दुसऱ्या दिवशी जगभरात 102 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पहिल्या दोन दिवसांच्या जागतिक कलेक्शनने या चित्रपटाचा २०० कोटींच्या गल्ला जमावला आहे. यासोबतच जवानचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दोन दिवसांत 231 कोटींवर पोहोचले आहे.

त्याचवेळी, शाहरुख खानच्या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 74.50 कोटींची कमाई केली होती. जवानच्या बंपर कमाईमुळे हा देशातील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला. रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही चित्रपटाच्या कमाईने 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी चित्रपटाचे कलेक्शन 52.50 कोटी रुपये होते. येत्या दोन दिवसांत हा चित्रपट आणखी कमाई करेल अशी चर्चा रंगली आहे.