Dosti Ke Side Effetss Trailer: अभिनेत्री सपना चौधरी हिचा 'दोस्ती के साईड इफेक्ट्स' मधील बोल्ट अंदाज पाहिलात का? (Video)
अभिनेत्री सपना चौधरी (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

हरियाणा (Haryana) मधील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सपना चौधरी (Sapna Choudhary) हिचा बॉलिवूड मधील आगामी चित्रपट 'दोस्ती के साईड इफेक्ट' (Dosti Ke Side Effetss) चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. तर आपल्या बोल्ड अंदातून सपना चौधरी तिच्या चाहत्यांची मने जिंकणार आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सपना चौधरी ही पोलिसांच्या वर्दीमध्ये झळकणार आहे. तसेच सपनाचे धमाकेदार फायटिंग आणि अॅक्शन सिन्स या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची कथा चार जीवलग मित्रांवर आधारित आहे. एका मित्राला जगातील श्रीमंत व्यक्ती बनण्याचे आहे. तर दुसऱ्याचे जगातील श्रीमंत तरुणीशी लग्न कराचे, तिसऱ्याचे राजकीय बापाच्या समोर आपला पक्ष उभे करण्याचे आहे. मात्र चौथ्या मित्राचे स्वप्न हे आयपीएस ऑफिसर बनण्याचे आहे.(हेही वाचा-सपना चौधरी हिचे गाणे न वाजवल्याने रेस्टॉरंटमधल्या मालकाला मारहाण)

मात्र चित्रपटातील सपना हिच्या एन्ट्रीमुळे मित्रांच्या आयुष्यात काय घडामोडी होतात हे पाहण्याजोगे आहे. येत्या 8 फेब्रुवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.