अभिनेत्री सपना चौधरी हिचे हॉट फोटोशूट पाहिले का?
सपना चौधरी (Photo Credits: Instagram)

आपल्या नृत्यातून आणि गाण्यांमधून प्रसिद्ध झालेली हरियाणाची अभिनेत्री सपना चौधरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तर गेल्या वर्षी बिग बॉस 11 च्या सिझनमधून बाहेर पडल्यानंतर सपना चौधरीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

सपना चौधरी (Sapna Chaudhary) हिने नुकतेच सोशल मीडियावर तिचे हॉट फोटोशूट केलेले फोटो पोस्ट केले आहेत. त्यात सपना हिने पांढऱ्या रंगाचा स्लिव्हलेस रफल ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये सपना चौधरीचा हा लूक अतिशय सुंदर आणि नेटकऱ्यांना घायाळ करणारा आहे.(हेही वाचा-सपना चौधरी हिचे गाणे न वाजवल्याने रेस्टॉरंटमधल्या मालकाला मारहाण)

 

View this post on Instagram

 

''kill tension before tension kills you'' #happytime #mastii #desiqueen

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

बिग बॉस 11 च्या सिझनमध्ये सपना चौधरी ही विजेतीची पदाची मानकरी ठरली नाही. परंतु बॉलिवूड कलाकारांकडून तिचे भरभरुन कौतूक केले गेले. सध्या ग्लॅमरस लूक मधील सपना नेटकऱ्यांना नेहमीच तिच्या नृत्यातून किंवा गाण्यातून आपली छाप पाडत असते. तर लवकर सपना एका बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा सुरु आहे.