सपना चौधरी (Photo Credits: Instagram)

एकेकाळी फक्त हरियाणामध्ये लोकप्रिय झालेली सपना चौधरी (Sapna Chaudhary) हिची एक झलक पाहण्यासाठी भारतातील लोक खूप वेडे झालेले दिसून येतात. तसेच सपनाच्या गाण्यांनी प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली आहे. मात्र सपनाच्या लाईव्ह शोच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे लोकांचा जीव ही गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच पद्धतीचा अजून किस्सा नोएडा येथे वाढदिवासाच्या पार्टीमध्ये घडून आला आहे.

नोएडा येथील गॅलेरीया मॉलमधील एका रेस्टॉरंटमध्ये बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टी ठेवण्यात आली होती. पार्टीच्या दरम्यान सर्व जवळची मंडळी उपस्थित होती. खानपान झाल्यानंतर या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या काही मंडळींनी सपना चौधरी हिचे प्रसिद्ध गाणे 'तेरी आख्या को यो काजल' हे वाजवण्यास सांगितले. त्यावेळी डीजेवाल्याने त्याच्या जवळ हे गाणे नसल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा पार्टीतील लोकांनी त्याला सपनाचे दुसरे गाणे लावण्यास सांगितले. ते सुद्धा डीजेवाल्याकडे नव्हते. त्यामुळे पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी रेस्टॉरंटमधील मालकाचे डोके फोडले आणि वेटरला ही जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. (हेही वाचा-सपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा मृत्यू)

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी, 'आम्ही पार्टी करण्यासाठी पैसे दिले होते. तरीही आमच्या पसंदीची गाणी न वाजवल्याने हे कृत्य केल्याचे सांगितले आहे'. तसेच आरोपींनी अशा पद्धतीने रेस्टॉरंट मालक आणि वेटरशी अशी वर्तवणूक करणे चुकीचे आहे. त्यामुळे आता सर्व आरोपींना तुरुंगात पाठविण्यात आले आहे.