#YearInSearch : या आहेत 2018 मध्ये Google वर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टी; प्रिया प्रकाश आणि सपना चौधरीचाही समावेश
स्टॅच्यू ऑफ युनिटी (Photo Credits: File Image)

जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून गुगल (Google) कडे पहिले जाते. गुगलनेदेखील विविध पर्याय, नवनवीन ट्रेंड्स उपलब्ध करून देऊन वापरकर्त्यांची गोष्टी सहज शोधण्याची सोय केली. म्हणूनच जगातील कोणत्याही आणि कसल्याही गोष्टीची माहिती प्राप्त करून घेण्यास बोटे पहिल्यांदा गुगलकडे वळतात. अशातच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी 2018 मध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या शब्दा संदर्भातील माहिती ट्विटरवर दिली आहे. #YearInSearch या हॅशटॅगद्वारे विविध विषयांबाबत सर्व झालेल्या सर्वाधिक शब्दांची माहिती दिली जाते. या वर्षी सर्वाधिक सर्च झालेला शब्द ठरला आहे Good. याचसोबत गुगलने विविध श्रेणींमध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टींचीही माहिती दिली आहे. या श्रेणी आहेत चित्रपट (Movies), नियर मी (Near Me), हाऊ टू (How to...), व्हॉट इज (what is...), गाणी (songs), स्पोर्ट्स इव्हेंट्स (sports events), व्यक्तिमत्वे (personalities) आणि ओव्हरऑल (overall). चला तर पाहूया या श्रेणींमध्ये कोणत्या गोष्टी सर्वाधिक शोधल्या आहेत.

चित्रपट – रोबोट 2.0, बागी 2, रेस 3, एव्हेंजर्स आणि टायगर जिंदा है.

ओव्हरऑल – फिफा वर्ल्ड कप, लाईव्ह स्कोअर, आयपीएल, कर्नाटक निवडणूक निकाल आणि बाल वीर

हाऊ टू – व्हॉट्सअॅपवर स्टिकर्स कसे पाठवावे, मोबाईल नंबरला आधार कसे लिंक करावे, रांगोळी कशी काढावी, मोबाईल नंबर पोर्ट कसा करावा आणि बीटकॉईन कसे इन्व्हेस्ट करावे.

व्हॉट इज – सेक्शन 377 काय आहे?, सिरीयामध्ये काय घडत आहे?, किकी चॅलेंज काय आहे?, metoo हे काय प्रकरण आहे?, बॉल टेंपरिंग काय आहे?

नियर मी – मोबाईल दुकाने, सुपरमार्केट, गॅस स्टेशन, कॅश पॉइंट, कार डीलर्स

व्यक्तिमत्वे – प्रिया प्रकाश, निक जोनस, सपना चौधरी, प्रियंका चोप्रा, आनंद अहुजा

बातम्या – फिफा वर्ल्ड कप, कर्नाटका निवडणुक निकाल, प्रियंका आणि निक लग्न, स्टॅच्यू ऑफ युनिटी, निपाह व्हायरस

गाणी – दिलबर दिलबर, दारू बदनाम, तेरा फितूर, क्या बात है, देखते देखते

याचसोबत सुंदर पिचाई यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये गुड शब्दाशी निगडीत गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. व्हिडीओच्या शेवटी चांगल्या गोष्टी सर्च करणे नेहमीच फायद्याचे असते त्यामुळे सर्च करत राहा असा संदेशही दिला आहे.