Dia Mirza होणार आई! सोशल मीडियाद्वारे शेअर केली गुडन्यूज
Dia Mirza (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) हिला नव्या पाहुण्याची चाहुल लागली आहे. दिया मिर्झा लवकरच आई होणार असून सोशल मीडिया पोस्टद्वारे (Social Media Post) तिने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. बेबी बंप (Baby Bump) सह फोटो आणि खास संदेश लिहित तिने ही गुडन्यूज दिली आहे. "अंगाई, गोष्टी, गाणी अशा सगळ्याला लवकरच सुरुवात होणार असून माझ्या गर्भात एक सुंदर स्वप्न वाढत आहे," असे तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे. या गोड बातमीनंतर तिच्यावर बॉलिवूड कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सध्या दिया मिर्झा पती वैभव रेखी आणि सावत्र मुलगी समायरा सोबत मालदिवमध्ये आहे. सुट्टी एन्जॉय करत असतानाचे अनेक फोटोज तिने यापूर्वी सोशल मीडियावर शेअर केले होते. (Dia Mirza-Vaibhav Rekhi Wedding: दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली अभिनेत्री दिया मिर्झा; बॉयफ्रेंड 'वैभव रेखी'सोबत बांधली गाठ, पहा नव्या जोडप्याचे फोटो आणि व्हिडीओ)

पहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

फेब्रुवारी महिन्यात दियाने मुंबईतील बिजनेसमॅन आणि फायनेंशियल इन्वेस्टर वैभव रेखी सोबत लग्नगाठ बांधली. वैभव रेखीचे हे दुसरे लग्न असून त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. दियाचे देखील हे दुसरे लग्न असून 2019 मध्ये तिने साहिल संघा यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. दिया 2014 मध्ये साहिल संघा सोबत विवाहबद्ध झाली होती. लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.