Deepika Padukone आणि Ranveer Singh हॉस्पिलटमध्ये दाखल; सोशल मीडियावर अफवांना उधाण
Deepika Padukone & Ranveer Singh (Photo Credits: Yogen Shah)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांची जोडी अत्यंत लोकप्रिय आहे. या जोडीचे असंख्य चाहते असून दीपवीर (DeepVeer) बद्दलची कोणत्याही गोष्टीची सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगते. सध्या अशीच एक घटना घडली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. आज दीपिका आणि रणवीर मुंबई (Mumbai) मधील हिंदुजा हॉस्पिटल (Hinduja Hospital) मध्ये गेले होते. या घटनेचे फोटोज समोर येताच अफवांना उधाण आले आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे.

फोटोग्राफर वायरल भियानीने इंस्टाग्रामवर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने दीपवीर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये गेल्याचे म्हटले आहे. मात्र ही पोस्ट पाहिल्यानंतर दीपिका प्रेग्नेंट असल्याचा अंदाज चाहत्यांनी  बांधला असून दीपवीरला शुभेच्छा देत आहेत. मात्र अद्याप दीपिका आणि रणवीर हॉस्पिटलमध्ये का गेले होते, याचे कारण समोर आलेले नाही. परंतु, सर्वकाही ठीक असावे, असी आशा करुया. (भारतामधील पहिला Aerial Action Franchise चित्रपट असेल 'फायटर'; Hrithik Roshan आणि Deepika Padukone पहिल्यांदाच दिसणार एकत्र)

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दीपिका-रणवीर 2018 मध्ये विवाहबद्ध झाले. त्यानंतर चाहते त्यांच्याकडून गुडन्यूज कधी मिळणार, याची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, दीपिका पदुकोण सध्या शाहरुख खानच्या सिनेमात काम करत आहे. तर रणवीर सिंह 'द बिग पिक्चर' या टीव्ही शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.