Fighter Film: भारतामधील पहिला Aerial Action Franchise चित्रपट असेल 'फायटर'; Hrithik Roshan आणि Deepika Padukone पहिल्यांदाच दिसणार एकत्र
Hrithik Roshan, Deepika Padukone (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचा पुढील चित्रपट 'फाइटर'ची (Fighter) घोषणा झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाविषयी चर्चा होती. पण या चित्रपटाविषयी कसलीच पुष्टी होत नव्हती. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटद्वारे या चित्रपटासंदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे. तरन आदर्शच्या ट्विटनंतर या चित्रपटाविषयीची चर्चा आणखी वाढली आहे. तरन यांनी सांगितले आहे की, ‘फाइटर; हा चित्रपट भारतामधील पहिला 'एरियल अ‍ॅक्शन फ्रेंचायझी' (Aerial Action Franchise) चित्रपट असेल.

प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटामध्ये भरपूर अ‍ॅक्शन असणार आहे. हा चित्रपट अनेक भागांत बनवला जाणार आहे,  ज्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाविषयी खूप उत्सुक आहेत. व्हायाकॉम 18 स्टुडिओ या दमदार चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सिद्धार्थ आनंदने यापूर्वी हृतिक रोशनबरोबर 'वॉर‘ हा चित्रपट बनविला आहे. यामुळे आता पुन्हा एकत्र काम करण्यास दोघेही खूप उत्सुक आहेत. सिद्धार्थ आनंदचा ‘वॉर’ हा चित्रपट 2019 चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा व्यवसाय केला होता.

हृतिक रोशनने 10 जानेवारी 2020 रोजी त्याच्या अकाउंटवर या चित्रपटाशी संबंधित एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. हा चित्रपट पुढील वर्षी 22 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट शौर्य, त्याग, देशप्रेम आणि सैन्याच्या कथेवर आधारित असेल असे तरण आदर्शने सांगितले आहे. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी बनविला जाईल, ज्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग जगातील अनेक देशांत होणार आहे. (हेही वाचा: The Big Picture Promo: 'द बिग पिक्चर' द्वारे Ranveer Singh करणार टीव्हीवर डेब्यू; समोर आला शोचा हटके प्रोमो (Watch Video)

दरम्यान, या चित्रपटाचे बजेट सुमारे 250 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. हृतिक प्रथम ‘विक्रम वेधा’चे शूटिंग पूर्ण करेल, दुसरीकडे दीपिकाही ‘पठाण’ आणि ‘द इंटर्न’चे शूटिंग पूर्ण करेल. त्यानंतरच फायटरचे शुटींग सुरु होईल.