Ajay Devgn च्या 'मैदान' सिनेमाच्या सेटला Cyclone Tauktae चा फटका; झाले मोठे नुकसान
Ajay Devgn (Photo Credits: Instagram)

तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) देशातील अनेक राज्यांमध्ये थैमान घातले. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये मोठे नुकसान केले. अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. वीजपुरवठा खंडीत झाला. तौक्ते चक्रीवादळाने केलेल्या नुकसानाच्या अनेक घटना समोर येत असताना आता सिनेमा सेटवरला या चक्रीवादाळचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. ई-टाईम्सच्या रिपोर्टनुसार, तौक्ते चक्रीवादळाने अजय देवगन (Ajay Devgn) याच्या 'मैदान' (Maidaan) सिनेमाच्या सेटचे देखील मोठे नुकसान केले आहे. येथे सिनेमाच्या मोठ्या भागाचे शूटिंग होणार होते. परंतु, आता या सेटची अवस्था अत्यंत बिघडली आहे.

रिपोर्टनुसार, चक्रीवादळ आले तेव्हा सेटवर सुमारे 40 लोक होते. सेट वाचवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु, त्याचा काही फायदा झाला नाही. सिनेमा सेटचे नुकसान होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 16 एकर मध्ये बांधलेल्या या हाय मेटेन्सस सेटला मे 2020 मध्ये कोविड-19 लॉकडाऊन आणि पाऊस यामुळे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा चक्रीवादळाचा फटका बसल्याने नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. (Ajay Devgn RRR Look: अजय देवगण चा ‘RRR’ लूक त्याच्या बर्थ डे दिवशी झाला रिलीज, Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

'मैदान' सिनेमाचे आऊटडोअर शूटिंग कोलकाता आणि लखनऊ येथे चित्रित करण्यात येत आहे. या सिनेमाची निर्मिती बोनी कपूर करत असून अमित शर्मा दिग्दर्शन करत आहेत. 31 मे 2021 रोज लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील 15 दिवसांत सिनेमाचे उर्वरीत शूटिंग करण्याचा दिग्दर्शकाचा मानस होता. मात्र आता त्यावरही पाणी फिरले आहे.