Mandana Karimi | (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड चित्रपट आणि Intimate Scenes असे एक घट्ट नाते गेल्या अनेक वर्षांपासून जमले आहे. हे नाते इतके घट्ट झाले आहे क, अलिकडे तर प्रमोशन करताना चित्रपटांच्या कथानकापेक्षा या दृश्यांचीच अधिक चर्चा होते. अभिनेत्री मंदाना करीमी हिने या दृश्यांबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. कोरोना व्हायरस संकट विचारात घेऊन सोशल डिस्टंन्सींग पाळण्यासाठी चित्रपटातील Intimate Scenes बदलावे लागतील. ईरानी चित्रपटांमध्ये असे अनेक वर्षांपासून होते, असे मंदाना करीमी हिने म्हटले आहे. 'द कसीनो' या वेब सीरीजमध्ये मंदाना करीमी प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. ही वेबसीरिज प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

मंदाना हिने आयएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'मला वाटते की कोविड 19 नंतर आता सिनेमाच्या पडद्यावरील उत्तेजीत दृश्यांमध्ये, त्याच्या चित्रिकरणात आणि प्रसारणातही मोठा बदल होईल. आम्हाला नवे नियम माहिती आहेत तसेच, सोशल डीस्टन्सींग पाळताना नवे नियम आता आमच्या जीवनशैलीचा भाग झाले आहेत. आम्हाला आम्ही सुरक्षित असल्याचा विश्वास मिळणे हेसुद्धा महत्त्वाचे असणार आहे. आमच्या मनात हा विषय दीर्घकाळ राहणारा असेल.'

मदाना करीमी पुढे बोलताना सांगते की 'मी एक इरानी आहे. मी खूप सारे इरानी चित्रपट पाहिले आहेत. ज्या चित्रपटांमध्ये कोणत्याही अतिरंजीतपणाशिवाय शरीरप्रदर्शन केले जाते. एक कलाकार, एक लेखक म्हणून आम्ही कथानक योग्य आणि अधिक प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीकोणातून प्रयत्न करत असतो. त्यामुळे अशा गोष्टी दाखवण्याचा प्रयत् केला जातो. ज्या अधिकाधिक पाहिज्या जातील. मला वाटते येत्या काळामध्ये आम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहे. त्यामुळे चित्रपटात Intimate Scenes देताना आणि चित्रित करताना काहीतरी नवा पर्याय निवडावा लागणार आहे.' (हेही वाचा, रोजंदारी कामगारांना मदत करण्यासाठी अभिनेत्री वाणी कपूर चा हटके फंडा; 5 फॅन्ससोबत व्हर्च्युअल डेट वर जाउन जमवणार मदतनिधी)

मंदाना करीमी हिचा 'द कसीनो' एका श्रीमंत परंतू विनम्र तरुणाची कहाणी आहे. जो आपल्या वडिलांच्या मल्टी-बिलियन डॉलर्स किमतीच्या कसीनोचा वारत आहे. यात अनेक रहस्यमय गोष्टी आणि हाय-क्लास सोसायटीच्या अनेक कटांचा खुलासा होतो. या वेबसीरिज मध्ये करणवीर बोहरा, सुधांशु पांडे, मंदाना करीमी, ऐन्द्रिता रे, धनवीर सिंह यांच्यासारखे कलाकार आहेत. ही वेबसीरिज हार्दिक गज्जर द्वारा दिग्दर्शित करण्यात आली आहे. या सीरीजचा पहिला शो 12 जूनला जी 5 वर प्रकाशित केला जाणार आहे.