Emergency First Look (Photo Credit - Twitter)

कंगना राणौतने (Kangana Ranaut) पडद्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आता 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटात देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये कंगनाने तिच्या दमदार लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले. पहिल्या लूकमध्ये ही अभिनेत्री हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसत आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार कंगनाच्या या चित्रपटावर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. ETimes च्या वृत्तानुसार, कंगना रणौतच्या अभिनयाने सजलेल्या या आगामी चित्रपटावर राजकीय पक्ष काँग्रेसचा आक्षेप आहे. अधिकृत प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी त्यांना 'इमर्जन्सी' चित्रपट दाखवावा, अशी काँग्रेसची मागणी आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांचे मत आहे. दरम्यान, चित्रपटामुळे ते घाबरले असल्याने काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतल्याचे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या मीडिया उपाध्यक्षा संगीता शर्मा यांनी तर कंगना राणौतला भाजपची एजंट म्हटले आहे.

कंगना राणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत

अलीकडेच कंगना राणौतने इंदिरा गांधींचा लूक तयार करताना केलेल्या मेहनतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटाचा सेटअप कसा तयार करण्यात आला होता, कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत कशी बसते हे दाखवण्यात आले आहे. इंदिराजींच्या साडीपासून मेकअपपर्यंत प्रत्येक पैलूवर बारकाईने काम केले आहे. हा टीझर रिलीज होताच तो यूट्यूबवर नंबर 1 ट्रेंड करू लागला. (हे देखील वाचा: Samantha Ruth Prabhu ने Akshay kumar सोबत केला 'ओ अंटवा' गाण्यावर डान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगनाने 'इमर्जन्सी'चे केले दिग्दर्शन

कंगना राणौतने इंदिरा गांधींच्या गेटअपशी जुळवून घेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी मेकअप आर्टिस्ट डेव्हिड मालिनॉस्कीने अप्रतिम कौशल्य दाखवले आहे. कंगना या चित्रपटाची दिग्दर्शिकाही आहे. आतापर्यंत, निर्मात्यांकडून चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटासोबतच कंगना तिसऱ्या बायोपिकमध्येही दिसणार आहे.