Thalaivi चित्रपटातील 'चली चली' गाणे सोशल मिडियावर व्हायरल, Kangana Ranaut वर चित्रित करण्यात आलेल्या गाण्याला मिळाले 17 लाखांहून अधिक व्ह्यूज
Chali Chali Song in Thalaivi (Photo Credits: YouTube)

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला 'थलायवी' (Thalaivi) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. नुकतेच या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले. 'चली चली' (Chali Chali) असे या गाण्याचे बोल आहेत. गाणे प्रदर्शित होऊन एक दिवस उलटून गेला आहे. मात्र या गाण्याने प्रेक्षकांचा मने जिंकली असे एकूनच या गाण्याला युट्यूबवर मिळालेल्या व्ह्यूजवरुन दिसत आहे. कंगना रनौतवर चित्रित करण्यात आलेल्या गाण्याला 17 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आठवड्याभरापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

थलायवी चित्रपटातील 'चली चली' हे गाणे सांधवी हिने गायिले आहे. हे गाणे इरर्शाद कामील यांनी लिहिले असून जी व्ही प्रकाश कुमार यांचे संगीतकार आहेत.हेदेखील वाचा- Ajay Devgn RRR Look: अजय देवगण चा ‘RRR’ लूक त्याच्या बर्थ डे दिवशी झाला रिलीज (Watch Video)

'थलाइवी' हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात जयललिता यांची भूमिका करण्यासाठी कंगनाने आपले वजन सुमारे 20 किलोने वाढवले ​​आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

येत्या 23 एप्रिलला थलायवी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना रनौत हिच्यासह अरविंद स्वामी, नासर, भाग्यश्री, राज अर्जुन, मधुबाला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. लॉकडाऊननंतर कंगनाने थलाईवीच्या शुटिंगला सुरूवात केली होती. त्यासाठी ती दक्षिण भारतात गेली होती.