Viral Video: अभिनेता शाहरुख खानचा जवान चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. शाहरुख खानचा चाहता वर्ग भरपूर मोठा आहे. जवान चित्रपट हा भारतातच नव्हे तर फोरेन देशात ही धुमाकुळ घालत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटाची गाणी देखील प्रेक्षकांना पसंत पडली आहे. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक तरुणी चलेया गाण्यावर डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये ती तरुणी हॉस्पिटलमध्ये जवान मधील 'चलेया' गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कंमेट देखील केले आहे. हा व्हिडिओ पाहून शाहरूख खाने प्रतिक्रिया दिली आहे.
शाहरुख खानने तरुणीच्या हॉस्पिटलमधील डान्स व्हिडीओ पाहून ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "हे खूप छान आहे! धन्यवाद... लवकर बरे व्हा आणि चित्रपट पहा!!! दुसर्या डान्स व्हिडीओची वाट पाहत आहे पण तुम्ही हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर…. लव्ह यू!!"
Hospital patient dancing on Chaleya from #Jawan. INSANE! Shah Rukh Khan is the resource of happiness.. pic.twitter.com/gzPlJUu7SN
— ℣αɱριя౯ (@SRKsCombatant) September 13, 2023
This is very good! Thank u… Get well soon and watch the film!!! Looking forward to another dance video but once you’re out of the hospital…. Love u!! https://t.co/LjzAwSSP6k
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 14, 2023