Friendship Day 2024 Songs: भारतात दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस साजरा केला जातो. आज (4 ऑगस्ट 2024) मैत्री दिवस साजरा केला जाईल. हा दिवस मैत्रीच्या सुंदर नात्याला समर्पित आहे. जगातील सर्व देशांमध्ये मैत्रीच्या माध्यमातून आनंद आणि एकात्मतेचा संदेश देण्याचा उपाय म्हणून हा दिवस अस्तित्वात आला, असे म्हटले जाते. मित्रांसोबत घालवलेले क्षण आपल्या जीवनात आनंद देतात आणि आठवणींचा खजिना तयार होतो. मैत्रिणीचे महत्त्व सांगणारी बॉलिवूडमधील हे गाणी एकदा ऐकाचं. (हेही वाचा- मैत्री दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Wishes, Quotes देत साजरा करा फ्रेंडशीप डे!)
ये दोस्ती हम नही तोडेंगं
मैत्रीच्या गाण्याबद्दल बोलायचे झाले तर बॉलिवूडमधीय चित्रपट शोले यातील हे गाणं तर यादीतील सर्वात पहिलं मानलं जातं. दिग्गज आरडी बर्मन यांनी संगीतबध्द केलेले आणि आनंद बक्षी यांनी हे गाणं लिहले आहे. बॉलिवूड मधील हे गाणं सर्वात प्रसिध्द आहे. त्यात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद होते. जय आणि वीरू ही जोडी काही काळासाठी खूप प्रसिध्द झाली होते.
सलामत रहे दोस्ताना हमारा
१९०८० च्या दोस्ताना चित्रपटातील लोकप्रिय गाणं म्हणजे सलामत रहे दोस्ताना हमारा. या गाण्यात बॉलिवूडचे सुप्रिध्द अभिनेते अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा आहेत. हे बॉलीवूडमधील संगीतकार किशोर कुमार आणि आरडी बर्मन यांनी गायले होते.
तेरा यार हुॅं मै
सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटातील हे गाणं आहे. हे गाणं ह्रदयस्पर्शी आहे. हे गाणं अरिजित सिंग यांनी गायलं आहे. या गाण्यात कार्तिक आर्यन, सनी सिंग आणि नुशरत भरुच्चा होते. कार्तिक आर्यन आणि सनी सिंग यांची मैत्री या चित्रपटात पाहायला मिळते.
जाने नही देंगे तुझे
बॉलिवूडमध्ये सर्वात प्रसिध्द झालेला चित्रपट 3 इडियट्स. हा चित्रपट खास मित्रांसाठी बनवला आहे. या चित्रपटातील जाने नही देंगे तुझे हे गाणं भावनिव आहे. तुमचा मित्र कशा संकटकाळी आधारस्तंभ म्हणून त्यांच्या पाठीशी उभे आहेत हे या गाण्यांत दिसते. सोनू निगमने गायलेले, स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेले मधुर गाणे. त्यात आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी होते.