प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

बॉलिवूडमध्ये काही स्मॉल बजेट चित्रपट केलेले दिग्दर्शक संतोष गुप्ता (Director Santosh Gupta) यांच्या पत्नी आणि मुलीने अंधेरीतील (Andheri) राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुप्ता यांच्या मुलीने आणि पत्नीने राहत्या घरी स्वत:ला जाळून घेतल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी डीएन नगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गुप्ता आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि दोघे वेगळे राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सुसाईड नोट देखील सापडली आहे.

दिग्दर्शक संतोष गुप्ता यांची पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी स्वतःला पेटवून घेतले. यात अस्मिताचा जागीच मृत्यू झाला असून सृष्टी 70 टक्के भाजली होती. मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. अस्मिताच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. तसेच त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा बेताची होती. त्यामुळे ते नेहमी नैराश्यात असायचे आणि याच कारणामुळेच त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊन उचलल्याचं त्यांच्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.हेदेखील वाचा- Dance Deewane 3 च्या सेट वर 18 क्रू मेंबर्स नंतर आता जज Dharmesh Yelande आणि निर्माते Arvind Rao देखील कोविड पॉझिटीव्ह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिताच्या मोबाईलमध्ये जी सुसाइड नोट सापडली आहे, त्यात त्यांनी आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार न धरण्याच सांगितलं आहे. मात्र पोलिसांनी एडीआर दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

संतोष गुप्ता यांनी बॉलिवूडमध्ये काही स्मॉल बजेट सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी फरार, रोमी द हिरो आणि आज की औरत यासारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.