
मुंबई मध्ये झपाट्याने वाढणारा कोरोना वायरस सध्या बॉलिवूडसाठी चिंतेची बाब ठरत आहे. अनेक कलाकार सध्या कोरोनाच्या विळख्यात आहेत. टेलिव्हिजन क्षेत्रातील रिअॅलिटी शो डान्स दिवाने 3 आता त्याला अपवाद नाही. यापूर्वी या शोच्या 18 क्रु मेंबर्सला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त होते. यामध्ये आता या शोचा परीक्षक धर्मेश येलांडे (Dharmesh Yelande) देखील कोविड पॉझिटीव्ह असल्याचं समजलं आहे. ETimes च्या अहवालानुसार धर्मेश सध्या गोव्यामध्ये क्वारंटीन आहे. धर्मेम्श सोबतच शो चे निर्माते अरविंद राव देखील कोविड पॉझिटीव्ह आहेत. Wagle Ki Duniya: सुमित राघवनचा शो ‘वागले की दुनिया’च्या सेटवर 8 जणांना कोरोना विषाणूची लागण; BMC कडून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश .
दरम्यान सध्या कोविड 19 परिस्थितीचा सामना करत डान्स दिवाने शो चं शूटिंग पुढे सुरू ठेवलं जाणार आहे. त्यामध्ये धर्मेश ऐवजी आता पुनीत पाठक जज च्या भूमिके मध्ये दिसणार असल्याचं वृत्त आहे. सध्या 48 तासांचा कोवीड आरटी पीसीआर टेस्ट करून जे निगेटीव्ह आहेत तेवढ्यांनाच आतमध्ये प्रवेश देऊन शुटिंग सुरू ठेवलं जाणार आहे.
डान्स दिवाने या शोमध्ये यापूर्वी 18 जण कोविड पॉझिटीव्ह आल्याचं समजल्यानंतर नवीन क्रु या शो साठी तैनात करण्यात आला आहे. तर माधुरी दीक्षित, तुषार कालिया हे जज कायम असतील. राघव जुयाल या शो मध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये असणार आहे. मागील आठवड्यात 18 जण पॉझिटिव्ह आल्याचं कळल्यानंतर धर्मेश गोव्याला गेला होता. तेथे त्याला कोविडची लक्षणं दिसू लागल्याने त्याने केलेली टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.
मुंबई मध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने नियम कडक केले आहेत. मोजक्या लोकांमध्येच शूटिंगला परवानगी आहे. तर विकेंडला पूर्ण कडक लॉकडाऊन आहे. मागील काही दिवसांत सातत्याने मुंबईमध्ये 10 हजारांच्या वर कोरोना रूग्ण मुंबई मध्ये आढळत आहेत.