Arunoday Singh Divorces Wife: बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंह ने कुत्र्यांच्या भांडणावरून कॅनेडियन पत्नी ला दिला घटस्फोट
Arunoday Singh (PC - Facebook)

Arunoday Singh Divorces Wife: बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंह (Arunoday Singh) ने आपल्या कॅनेडियन पत्नी ली एल्टन (Canadian Wife Lee Elton) ला कुत्र्यांवरून झालेल्या भांडणावरून घटस्फोट दिला आहे. अरुणोदय हे मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते अजय सिंह यांचे सुपूत्र आहेत. आज या प्रकरणाची जबलपुर न्यायालयात (Jabalpur High Court) सुनावणी झाली.

दरम्यान, 2016 मध्ये बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंह आणि कॅनडाची रहिवाशी असलेली ली एल्टन यांचं नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न झालं होतं. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनीचं दोघांमध्येही वाद होऊ लागले. प्राप्त माहितीनुसार, अरुणोदय सिंह आणि त्याच्या पत्नीमध्ये कुत्र्यांच्या भांडणावरून वाद होऊ लागले. ली एल्टन आणि अरुणोदय या दोघांच्याही कुत्र्यांची आपसात लढाई झाली. त्यानंतर दोघांमध्येही वाद वाढत गेले. याशिवाय अरुणोदयने एल्टनवर अनेक गंभीर आरोपही लावले होते. 2019 मध्ये अरुणोदयने कॅनडामध्ये येणं जाणं बंद केलं. त्यानंतर त्याने 2019 रोजी भोपालच्या फॅमिली कोर्टात ली एल्टनविरोधात घटस्फोटासाठी अर्ज केला.

(हेही वाचा -Kangana Ranaut On Jaya Bachchan: जर माझ्या जागी श्वेता किंवा अभिषेक असता तर तुमची भूमिका समान राहिली असती का? कंगना रनौतचा जया बच्चन यांना सवाल)

त्यानंतर 18 डिसेंबर 2019 मध्ये भोपाळ कौटुंबिक न्यायालयाने एल्टनला काहीही माहिती न देता घटस्फोटाचे आदेश दिले. अरुणोदयने आपल्याला एकतर्फी घटस्फोट दिला, असं म्हणत ली एल्टनने जबलपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. भोपाळ न्यायालयाचा आदेश रद्द करावा, अशी मागणी एल्टनने याचिकेत केली आहे. या प्रकरणी येत्या 6 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.