Kangana Ranaut ने मुंबई कोर्टात दाखल केलेल्या नुकसान भरपाईच्या याचिकेवर आव्हान देत BMC ने दिले उत्तर, म्हणाली 'कंगनाची याचिका कायदेशीर प्रक्रियेचा अवमान करणारी आहे'
Kangana Ranaut Office Demolition (Photo Credits: Twitter)

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचे मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयाचा काही भाग मुंबई महानगरपालिकेने (BMC) नेस्तनाभूत केला. त्यानंतर पेटून उठलेल्या कंगना रनौत ने मुंबई कोर्टात धाव घेत मुंबई महानगरपालिकेविरोधात 2 कोटी नुकसान भरपाईची याचिका दाखल केली होती. त्या याचिकेला BMC ने आव्हान करत आपल्या प्रशासकीय शब्दांत दिले आहे. तसेच तिची ही याचिका कोर्टाने रद्द करावी अशी मागणी केली आहे. याउट कंगनाची ही याचिका म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा अवमान करणारी असल्याचे BMC ने म्हटले आहे. याबाबतचे एक प्रतिज्ञापत्र BMC कोर्टात सादर केले आहे.

BMC ने पाठविलेल्या प्रतिज्ञापत्रात 'कंगनाने दाखल केलेली याचिका कायद्याच्या प्रक्रियेचा अवमान करणारी आहे. त्यामुळे या याचिकेवर विचार करण्यात येऊ नये व यात नमूद करण्यात आलेली नुकसानभरपाईची रक्कम रद्द करण्यात यावी असे म्हटले आहे.' Kangana Ranaut Office Demolition: कंंगना रनौत चे ऑफिस तोडण्यावर BMC ने उत्तर द्यावे- मुंंबई उच्च न्यायालय

कंगना रनौत (Kangana Ranaut) 9 सप्टेंबरला मुंबईत येणार होती त्याच दिवशी सकाळी तिच्या वांंद्रे (Bandra) येथील कार्यालयात BMC कडुन सकाळी तोडफोड करण्यात आली. कंंगनाने या तुटलेल्या ऑफिसचे काही व्हिडिओ आपल्या ट्विटरवरुन शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये ऑफिसची पुर्णपणे वाताहात झाल्याचे दिसुन येत आहे. हा लोकशाहीचा मृत्यु आहे असे म्हणत कंंगनाने #DeathOfDemocracy अशा हॅशटॅग सह हे व्हिडिओ शेअर केले होते.