Kangana Ranaut Office Demolition: कंंगना रनौत चे ऑफिस तोडण्यावर BMC ने उत्तर द्यावे-  मुंंबई उच्च न्यायालय
High Court, Kangana Ranaut (Photo Credits: File Image)

कंंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या वांंद्रे (Bandra) येथील कार्यालयात BMC कडुन आज सकाळी तोडफोड करण्यात आली. या कारवाई विरोधात कंंगनाने मुंंबई उच्च न्यायालयामध्ये (Mumbai High Court)  धाव घेतली होती ज्या याचिकेवर काही वेळापुर्वी सुनावणी झाली असुन अजुनही न्यायालयाने आपला निर्णय राखुन ठेवला आहे. तसेच मुंबई हायकोर्टाने कंगना रनौत ने ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर बीएमसीला उत्तर देण्यास सांंगितले आहे. बीएमसीने आपले उत्तर दाखल केल्यावर यावर न्यायालय निर्णय देणार आहे. बीएमसीच्या या कारवाईवर कंंगनाच्या वकिलांंनी सुद्धा ही कारवाई सुडबुद्धीने आणि तिला उसकवण्यसाठी होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी कंगनाच्या मुंबई मधील कार्यालयामध्ये बुलडोझर आणि अन्य हत्यारांचा वापर करून तोडफोड करण्यात आली तर खार येथील तिच्या निवासस्थानाबाहेर नोटीस अवैध बांंधकाम असल्याची नोटिस लावण्यात आली आहे. कंंगनाच्या अपार्टमेंटच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, आजूबाजूचे 100 मीटरपर्यंतचे सर्व रस्ते बॅरिकेट लावून बंद करण्यात आले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, या सर्व प्रकरणात कंंगना ने पुन्हा संतप्त भुमिका घेत आपण पाकिस्तान म्हंंटल्याचे योग्य होते हे बीएमसीनेच सिद्ध केल्याचे म्हंंटले आहे. बीएमसी कर्मचार्‍यांंना बाबरी गॅंंग म्हणत तिने काही वेळापुर्वी फोटो ट्विट केले होते. आज संध्याकाळपर्यंत कंगना मुंंबईत परतणार आहे.