Bharat Poster: 'सलमान खान'ने शेअर केला 'भारत' सिनेमातील त्याचा 'यंग लूक'; सोबत दिशा पटानीची झलक
Salman Khan and Disha Patani in Bharat (Photo Credits: Twitter)

Bharat Ki Jawaani Poster: सलमान खानने (Salman Khan) काल (15 एप्रिल) दिवशी 'भारत' सिनेमातील वयोवृद्ध भूमिकेतील खास लूक शेअर केल्यानंतर आज (16 एप्रिल) तरूण्यातील सलमानचा एक नवा लूक शेअर केला आहे. यासमध्ये सलमान खान सोबत बॅकग्राऊंडला अभिनेत्री दिशा पटानीची (Disha Patani) देखील झलक पहायला मिळत आहे. "जवानी हमारी जानेमन थी." असा कॅप्शनसह सलमान खानने नवा लूक सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे.

सलमानच्या 'भारत' सिनेमातील लूकची खास झलक

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमामध्ये सलमान खान विविध लूक्समध्ये दिसणार आहे. सलमान खानच्या नव्या पोस्टरवर 1964 असं लिहलं आहे. फॅन्सी व्हाईट शर्ट आणि काळ्या चष्मामध्ये सलमान खानची झलक पाहता येत आहे. सर्कसमध्ये काम करणार्‍या Trapeze कलाकार म्हणून दिशा पटनी दिसत आहे. सिनेमामध्ये ती सलमान खानची बहीण आहे. 'भारत' चित्रपटातील सलमान खान ह्याला ओळखू सुद्धा शकणार नाहीत, लूक समोर आल्यानंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा

सलमान खान सोबत या सिनेमामध्ये अभिनेत्री कॅटरिना कैफ प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा यंदा ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 5 जून 2019 दिवशी रीलिज होणार आहे. सध्या सलमान खान 'दबंग 3' च्या शूटिंगमध्ये आहे. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांच्या सिनेमात आलिया भट्टसोबत दिसणार आहे.