भारत चित्रपट: सलमान खान लूक (फोटो सौजन्य-ट्वीटर)

बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) ह्याचा आगामी चित्रपट 'भारत' (Bharat) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला जाऊन पोहचली आहे. तर नुकताच कतरिना कैफ (Katrina Kaif) हिचा सुद्धा या चित्रपटातील लूक समोर आला आहे. कतरिना हिने स्वत: भारत चित्रपटातील लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 24 जानेवारीला प्रदर्शित करण्यात आला होता. तर आता सलमान खान ह्याचा भारत चित्रपटातील लूकमध्ये त्याला ओळखणे थोडे कठीणच आहे.

ट्वीटरच्या माध्यमातून सलमान खान ह्याने चित्रपटातील लूक पोस्ट केला आहे. तसेच नव्या लूकमधील सलमान खान ह्याला पाहताच क्षणी ओळखणे थोडे प्रेक्षकांना कठीण आहे. परंतु ह्या लूकमध्ये सुद्धा सलमान खुप सुंदर दिसून येत आहे.(हेही वाचा-'भारत' सिनेमातील कतरिना कैफ हिचा लूक आऊट (Photo)

भारत चित्रपटात कतरिना आणि सलमान यांच्यासह जॅकी श्रॉफ , दिशा पाटनी, सुनील ग्रोवर आणि तब्बू मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत. हा चित्रपट साऊथ कोरियाचा चित्रपट 'ओड टू माय फादर' या कथेचा रिमेक आहे. अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. भूषण कुमार आणि अतुल अग्निहोत्री यांनी चित्रपाटाची निर्मिती केली असून ईदच्या दिवशी भारत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.