
सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या हिट जोडीच्या 'भारत' (Bharat) सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये सलमान खान वेगवेगळ्या अंदाजात दिसला. आता सिनेमातील कतरिना कैफचा लूक समोर आला आहे. कतरिनाने सोशल मीडियावर हा लूक शेअर केला असून त्यात कतरिना अतिशय सुंदर दिसत आहे. पहा सिनेमाचा टीझर
हा फोटो शेअर करत ट्रेलर 10 दिवसात रसिकांच्या भेटीला येईल, असेही तिने लिहिले आहे. याचाच अर्थ 24 एप्रिलला भारत सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
पहा 'भारत' सिनेमातील कतरिना कैफचा लूक:
'भारत' सिनेमात सलमान-कतरिना या जोडी शिवाय जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, सुनील ग्रोवर, तब्बू या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमा 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.