अर्जुन रामपाल बाबा बनणार या खुशखबरीवर पहिली पत्नी मेहर जेसियाने 'ही' दिली प्रतिक्रिया
Arjun Rampal (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याच्याकडे खुशखबर असून तो लवकरच बाबा बनणार आहे. याबद्दल त्याने नुकताच फोटो पोस्ट करत त्याची प्रेयसी गॅबरिला (Gabriella Demetriades) हिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर तिसऱ्यावेळेस अर्जुन बाबा बनवणार आहे. मात्र यावर अर्जुन ह्याची पहिली पत्नी मेहर जेसियाने (Mehr Jesia) आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अर्जुन ह्याचा विवाह 1998 मध्ये मॉडेल मेहर जेसिया हिच्यासोबत झाला होता. त्यानंतर या दोघांना माहिका आणि मायरा अशा दोन मुली आहेत. मात्र आता अर्जुन आणि जेसिया यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. परंतु अद्याप या दोघांमध्ये घटस्फोट झालेला नाही. मात्र आता पुन्हा अर्जुन बाबा बनणार असल्याच्या गोष्टीवर मेहरने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मेहर हिने असे म्हटले आहे की, अर्जुन बाबा होणार आहे याबद्दल मला काहीच त्रास नाही आहे. आम्ही दोघे आपल्या आपल्या आयुष्यात पुढे गेलो आहेत.(अभिनेता अर्जुन रामपाल लग्नापूर्वी होणार बाबा, गर्लफ्रेंड गॅबरिला प्रेग्नेंट)

 

View this post on Instagram

 

Blessed to have you and start all over again....thank you baby for this baby 👶🏽

A post shared by Arjun (@rampal72) on

तर गॅबरिला हिच्याबद्दल बोलायचे झाल्यास ती साऊथ आफ्रिकेची मॉडेल आहे. यापूर्वी ती सोनाली केबल या चित्रपटातून झळकली होती. मात्र एका मुखाती दरम्यान गॅबरिला हिने असे सांगितले की, आतापर्यंत बॉलिवूड मध्ये एकच चित्रपट केला असून त्याचा अनुभव उत्तम नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये दुसरा चित्रपट करण्याची इच्छा नसल्याचे ही गॅबरिला हिने म्हटले होते.