अभिनेता अर्जुन रामपाल लग्नापूर्वी होणार बाबा, गर्लफ्रेंड गॅबरिला प्रेग्नेंट
अर्जुन रामपाल आणि गॅबरिला (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

मेहेर जेसिया (Mehr Jesia) हिच्या सोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) गेल्या काही काळापासून गॅबरिला डेमेट्रिएडस (Gabriella Demetriades)  हिला डेट करत आहे. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तसेच दोघांना खुप वेळा एकत्रसुद्धा पाहिले आहे.

आता गॅबरिला आणि अर्जुन यांच्यामधील नात्यामधील गुपित उघड झाले आहे. अर्जुन ह्याने इन्स्टाग्रामवर गॅबरिला सोबतचा फोटो पोस्ट करत असे लिहिले आहे की, मी खुप भाग्यवान आहे कारण तु माझ्या आयुष्यात आलीस. त्यानंतर आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली असून येणाऱ्या बाळासाठी तुला खुप शुभेच्छा. या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्याला बाबा होणार म्हणून भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.(Varun Dhawan Birthday Special: वरुण धवन याच्या या '5' सिनेमातील अभिनयामुळे तो ठरला स्टार!)

 

View this post on Instagram

 

Blessed to have you and start all over again....thank you baby for this baby 👶🏽

A post shared by Arjun (@rampal72) on

तर अर्जुन रामपाल तिसऱ्या वेळेस बाबा होणार आहे. त्याची पहिली बायको मेहर जेसिया पासून दोन मुले आहेत. तर लवकरच अर्जुन ह्याची मोठी मुलगी चित्रपटात पदार्पण करणार आहे. अर्जुनच्या सध्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो 'द फायनल कॉल' या वेबसीरिजमध्ये दिसून आला होता.