Arjun Kapoor Birthday:  मलाइका अरोडा हिने अर्जुन कपूर याला अनोख्या पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Photo)
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा (Photo Credits: Manav Manglani)

Arjun Kapoor Birthday: बॉलिवूड मधील अभिनेत्री मलाइका अरोडा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे बी-टाउन मधील दोघे चर्चित कपल आहेत. हे कपल आपल्या बोल्ड फोटोंसह पोस्टमुळे नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असतात. खुप अफवानतर अखेर 2019 मध्ये दोघांनी आपल्या रिलेशनशिपची कबुली दिली आहे. याच पार्श्वभुमीवर आज अर्जुन कपूर याचा 36 व्या वाढदिवसानिमित्त मलाइका हिने त्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

मलाइका हिने आपल्या इंस्टाग्रामवर अर्जुन कपूर सोबतचा एक छानसा फोटो शेअर केला आहे.यामध्ये तिने अर्जुन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले आहेत. हे दोघे गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. तसेच दोघांना बऱ्याचवेळा एकत्रित स्पॉट सुद्धा करण्यात आले आहे. मलाइकाने शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन असे म्हटले आहे की, Happy Birth my sunshine यामध्ये तिने अर्जुन याला टॅग सुद्धा केले आहे.(Kareena Kapoor ने खास व्हिडिओ शेअर करत Karishma Kapoor ला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Watch Here) 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

दरम्यान, शुक्रवारी रात्री अर्जुन याने मुंबईतील ताजमहल पॅलेस हॉटेलमध्ये काही फिल्म इंडस्ट्री मधील काही मित्र आणि परिवारातील सदस्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. जोरदार पार्टीमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट ते रणवीर सिंह आणि विजय देवरकोंडा पर्यंतचे स्टार्स यांची उपस्थिती दिसून आली. जान्हवी कपूर हिने सुद्धा आपली बहिण अंशुला कपूर आणि खुशी कपूर हिच्यासोबत पार्टीमध्ये सामील झाल्या होत्या.