Kareena Kapoor ने खास व्हिडिओ शेअर करत Karishma Kapoor ला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Watch Here)
Karishma Kapoor & Kareena Kapoor (Photo Credits: Instagram)

Happy Birthday Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा आज 47 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने तिच्यावर नातेवाईक, मित्र-मंडळी, नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच करीश्मा कपूरची धाकटी बहिण आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) हिने खास व्हिडिओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर तिच्यासाठी छानसा संदेशही लिहिला आहे. या व्हिडिओमध्ये करिश्मा करिनाचे लहानपणापासून आतापर्यंतचे फोटोज पाहायला मिळत आहेत.

पोस्टमध्ये करीनाने लिहिले की, "सर्वात बहादूर, खंबीर आणि मौल्यवान आहेस तू. माझी. बहिण, माझी बेस्ट फ्रेंड, माझी दुसरी आई आणि आमच्या कुटुंबाची केंद्रबिंदू आहेस तू. तुझ्यासोबत चायनीज फूड खाताना त्याचा स्वाद अधिकच वाढतो. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. कधी कधी मी विचार करते की मोठी बहिण कोण आहे आणि ती तू आहेस ही सर्वांत चांगली गोष्ट आहे. माझी लोलो."

पहा व्हिडिओ:

अमृता अरोरा ने देखील एक फोटो पोस्ट करत करिश्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amrita Arora (@amuaroraofficial)

करीनाच्या या पोस्टला उत्तर देताना करिश्माने लिहिले की, "हे खूप आवडलं. धन्यवाद बेबी सिस्टर." करिनाच्या या पोस्टवर मनीष मल्होत्रा आणि मलायका अरोरा यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी कमेंट करत करिश्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, कपूर आणि अरोरा सिस्टर्स मधील मैत्री सर्वश्रूत आहे.