
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने टी20 (T20) चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय काल सोशल मीडियाद्वारे जाहीर केला. एक भली मोठी पोस्ट लिहित टी20 वर्ल्ड कपनंतर या पदावरुन दूर होणार असल्याचे त्याने सांगितले. याशिवाय त्याने या प्रवासात मिळालेल्या साथीसाठी सर्वांचे आभार मानले. विराटच्या या निर्णयावर अनेकांच्या प्रतिक्रीया येत आहेत. त्यात त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिची ही भर पडली आहे. विराटच्या निर्णयावर प्रतिक्रीया देताना तिने इमोजीचा वापर केला आहे. (Virat Kohli नंतर टीम इंडियाचा T20 कर्णधार कोण बनणार? Rohit Sharma च नाही तर या खेळाडूंमध्येही आहे भरपूर दम)
खरंतर विराटच्या या निर्णयावर अनुष्का कशी प्रतिक्रीया देणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. अनुष्काने इंस्टाग्रावर स्टोरीवर विराटची पोस्ट शेअर करत लव्ह इमोजी सह शेअर केली आहे. दरम्यान, इतर सेलिब्रिटींप्रमाणे अनुष्का शर्मा देखील सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह आहे. (COVID-19 ग्रस्तांच्या मदतीसाठी विराट कोहली-अनुष्का शर्माने सुरु केली खास मोहीम, व्हिडिओ शेअर करून केली मदतीची अपील)
Anushka Sharma Insta Story:

अनुष्काचा झिरो सिनेमा अयशस्वी झाल्यानंतर ती सिल्वर स्क्रीन पासून दूर आहे. मात्र निर्माती म्हणून ती खूपच सक्रीय असून तिने आतापर्यंत अनेक वेब शोज प्रेक्षकांना दिले आहेत. या शोज ला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे. दरम्यान, या वर्षी जानेवारी महिन्यात विराट-अनुष्काला कन्यारत्न प्राप्त झाले असून तिचे नाव 'वामिका' असे आहे.