Anushka Sharma | (File image)

दुचाकीवरुन विनाहेल्मेट प्रवास केल्याने सोशल मीडियावर नेटीझन्सनी अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) हिला ट्रोल केले. अमिताभ बच्चन आपल्या चाहत्याच्या दुचाकीवर बसून शुटींगसाठी गेल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या काहीच तासात हा प्रकार घडला. यावर सोशल मीडियावर ट्रोलर्सनी हेल्मेट न वापरता प्रवासकेल्याबद्दल दोघांनाही ट्रोल केले. दरम्यान, मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) मात्र अनुष्का शर्मा हिच्यावर कायदेशीर कारावाई करत 10500 रुपयांचे चलन आकारले.

मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, संबधित वाहन मालकाला कलम 129/194(डी), कलम 5/180 आणि कलम 3(1)181 एमव्ही कायद्यान्वये चालकाला चालान जारी करण्यात आले आल्याचे माहिती दिली. तसेच, संबंधिताकडून 10500 रुपये वसूल केल्याचेही सांगण्यात आले.

ट्विट

रस्त्यात झाड पडल्याने अनुष्काने तिची कार सोडून बाईक चालवली. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनुष्कावर जोरदार टीका झाली. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले, हेल्मेटचे काय ? दुसऱ्याने म्हटले, ना मॅडम ने हेल्मेट पेहेना है ना उसके बॉडीगार्ड ने. काहींनी मुंबई पोलिसांना टॅग केले आणि आवश्यक कारवाई करण्याचे आवाहन केले. उत्तरात मुंबई पोलिसांनी माहिती दिली की याबाबत वाहतूक पोलिसांना माहिती देण्यात आली असून त्यांनी कारवाई केली आहे.