Anurag Kashyap Death Rumors: सोशल मीडियावर स्वत:च्या मृत्यूची अफवा ऐकल्यानंतर अनुराग कश्यप ने दिलं 'हे' भन्नाट उत्तर
Anurag Kashyap (Photo Credits-Twitter)

Anurag Kashyap Death Rumors: सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात येत आहे. केआरके (KRK) अर्थात कमाल आर खान याच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर अनुराग कश्यपला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. त्यांचे हे ट्विट पाहून अनेक नेटीझन्सनी अनुराग कश्यपला श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, केआरकेने अनुरागचा फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली होती. या ट्विटमध्ये केआरकेने म्हटलं आहे की, ‘अनुराग कश्यपचे निधन झाले. तो खरचं खूप चांगला कथा लेखक होता. आम्हाला त्यांची कायम आठवण येईल. तू कायम आमच्या आठवणीत राहशील.' (हेही वाचा - Kangana Ranaut Tweet: कंंगना रनौत मुंंबईतुन पुन्हा मुळगावी जायला निघाली; जाताना 'या' ट्विट मधुन लगावला महाराष्ट्र सरकार ला टोला)

या ट्विटनंतर अनुरागने केआरकेला खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. अनुराग कश्यपने आपल्या ट्विटर हँडलवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की,‘काल यमराजाचे दर्शन झाले. आज यमराजाने स्वत:च मला घरी आणून सोडलं आहे आणि म्हणाले, अजून तर तुला आणखी चित्रपट करायचे आहेत. जर तू चित्रपट बनवणार नाही तर मुर्ख\भक्त तो चित्रपट बॉयकॉट नाही करणार, त्यामुळे त्यांच्या जीवनाचे सार्थक कसे होणार. म्हणून तुला सोडून गेलो.’