Kangana Ranaut | (Photo Credits-Twitter Video)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)  मुंंबईतुन हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) ला जाण्यासाठी रवाना झाली आहे. मागील काही दिवसात घडलेल्या प्रसंगांंवरुन जाण्याआधी पुन्हा एकदा तिने आपल्या ट्विट मधुन जळजळीत टीका केली आहे. मी मुंंबईला परत येताना लोकांंनी मला मारायच्या धमक्या दिल्या, माझं घर तोडलं, ऑफिस तोडलं, अशी परिस्थिती आणली की मला माझ्या भोवती सिक्युरिटी घेऊन फिरावं लागलं त्या सगळ्यावरुनच मी मुंंबईची पाकिस्तान व्याप्त काश्मीर अशी केलेली तुलना किती योग्य होती हे दाखवुन दिलंं आहे, असे म्हणत कंंगनाने एक ट्विट केले आहे. तर दुसर्‍या ट्विटमधुन पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार ला निशाणा करत रक्षकच भक्षक होत चालले आहेत असा आरोप कंंगनाने केला आहे.

कंगना रनौतचा महाराष्ट्र सरकार वर मराठीमधून हल्ला; सीएम उद्धव ठाकरे यांचे 'रावण'च्या रूपातील चित्र केले पोस्ट (See Tweet)

कंगनाने ट्विट मध्ये "सध्याची परिस्थिती पाहता लोकशाही च चीरहरण होतंंय, ही लोकंं जी मला कमजोर समजतायत ते खुप मोठी चुक करत आहेत. एका महिलेला तुम्ही घाबरवुन खाली दाखवण्याचा प्रयत्न करताय पण त्यावेळी स्वतःची च प्रतिमा धुळीत मिळवताय इतकं लक्षात ठेवा,असंं म्हंंटलंं आहे.

कंगना रनौत ट्विट

दरम्यान, कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद मुंंबईत काही दिवस प्रचंंड चर्चेत होता अजुनही त्यावर उत्तर असे समोर आलेले नाही, याच पार्श्वभुमीवर काल कंंगनाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांंची सुद्धा भेट घेतली होती. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांंनी सुद्धा कंंगना विरुद्ध शिवसेनेने BMC मार्फत केलेल्या कारवाईचा विरोध दर्शवला होता, आता मुळगावी परतल्यावर कंगना काय करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.