Dadasaheb Phalke Award 2019: अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; प्रकाश जावडेकर यांची माहिती
(Photo Credits-Twitter)

बिग बी (Big B) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांना सुखावणारी एक घोषणा नुकतीच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी केली आहे. यानुसार यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार 2019 (Dadasaheb Phalke Award 2019) साठी सर्वानुक्रमते अमिताभ बच्चन यांच्या नावाची निवड झाल्याचे समजत आहे. काही वेळापूर्वी दिल्ली येथे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. आजवर बॉलिवूडची सिनेसृष्टी ज्या बिग बी अमिताभ यांनी गाजवली त्या परिश्रमाचे फळ म्हणून त्यांना यंदा या बहुमानाने सन्मानित करण्यात येणार आहे.

अमिताभ बच्चन यांना ययंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवडल्याचे समजताच सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.अमिताभ यांची व्यक्तिमत्व केवळ सिनेमांपुरते नाही तर राजकीय, सामाजिक, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय सर्व परिणामांवर नेहमीच उठून दिसले आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून आता त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

ANI ट्विट

अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्थानी या सिनेमापासून आपली कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर त्यांच्या रुपाने भारतीय सिनेसृष्टीला एक महानायक मिळाला. सुरवातीला अँग्री यंग मॅन अशी ओळख बनून समोर आलेले अमिताभ यांनी वयाच्या सत्तरीतही अनेकांना प्रेरणादायी ठरेल अशा भूमिका साकारल्या आहेत. आता देखील ते एबी अँड सीडी या मराठी सिनेमातून प्रेक्षकांना भेटीस येणार आहेत.