बिग बी अमिताभ बच्चन COVID-19 मुळे देशात निर्माण झालेल्या स्थितीमुळे गरजूंना रोज दान करत 2000 खाद्यपदार्थांचे पॅकेट
Amitabh-Bachchan (Photo Credits: Facebook)

कोरोनाशी लढा देण्यासाठी देशामध्ये सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. लॉकडाऊन अनेक गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि दिग्गज मंडळी पुढे येऊन अशा गोरगरीबांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यात अनेकांना कोरोना बाधितांसाठी सरकारच्या PM आणि CM सहायक निधीला देखील मदत केली आहे. यासोबतच रोजंदारीवर घर चालविणा-या लोकांवर आज लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली आहे. यांच्यासाठी स्वत: बिग बी अमिताभ बच्चन रोज 2000 खाद्यपदार्थांचे पॅकेट्स दान करत आहेत.

ही खूपच कौतुकास्पद बाब असून अन्य कलाकारही गोरगरीबांच्या मदतीला पुढे सरसावले आहेत. देशव्यापी लॉकडाऊन मुळे देशातील कुणा गरीबाची परवड होऊ नये यासाठी बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन गरजूंसाठी रोज पूर्ण शहरात दुपारचे आणि रात्रीचे जेवण पुरवत आहेत. यात ते 2000 जेवणाचे पॅकेट्स रोज गरीबांमध्ये दान करत आहेत. कोरोना व्हायरसचा अंधःकार दूर करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी गायली वडील हरिवंश राय यांची कविता; पहा व्हिडिओ

याशिवाय बिग बी ऑल इंडिया फिल्म एम्पॉई शी संबंधित रोजंदार लोकांच्या 1 लाख कुटूंबाला महिन्याचे रेशन सुद्धा देतच आहेत. त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्याशिवाय त्यांनी मुंबईत कुठे कुठे हे अन्न दिले जात आहे याची माहिती देखील दिली आहे. हाजी अली दर्गा, माहिम दर्गा, बाबुलनाथ मंदिर, ब्रांदामधील झोपडपट्टी आणि शहरातील काही गल्ली-बोळ्यातील काही झोपडपट्ट्यांमध्ये हे अन्न दिले जात आहे.

तसेच लॉकडाऊन मुळे घराबाहेर पडता येत नसले तरीही मी माझ्या परीने पुर्ण प्रयत्न करत आहे. मात्र परिवहन सेवेत बाधा येत असल्याने ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास थोडी समस्या निर्माण होत आहेत.