अमिताभ बच्चन (Image Credit: Twitter)

चीनच्या वुहान शहरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकुळ घातला आहे. या विषाणुमुळे जगभरात 70 हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातदेखील कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. देशात 5 हजारपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 149 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 400 पेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. परंतु, या विषाणु विरोधात लढण्यासाठी नागरिकांमध्ये जगण्याची उर्मी निर्माण व्हावी, यासाठी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी वडील हरिवंश राय बच्चन यांची कविता वाचून दाखवली आहे. अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अमिताभ यांनी लोकांमध्ये हिंमत वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. (हेही वाचा - बॉलिवुड अभिनेत्री सोनम कपूर च्या 'मसकली 2.0' गाण्याच्या नव्या व्हर्जनमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया रोमान्स; पहा व्हिडिओ)

या व्हिडिओमध्ये अमिताभ हरिवंश राय यांची ‘है अंधेरी रात पर दीवा जलाना कब मना है?’ ही कविता वाचत आहेत. या व्हिडिओला अमिताभ यांनी बाबूजींनी कवी संमेल्लनामध्ये ही कविता गायली असल्याचं म्हटलं आहे. बीग बींनी 4 मिनिटांत ही कविता वाचून दाखवली आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी तुम्हाला ही कविता नक्की हिंमत देईल.

दरम्यान, अमिताभ यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपले योगदान दिले आहे. त्यांनी ऑल इंडिया चित्रपट कर्मचारी संस्थेशी संबंधित तब्बल 1 लाख मजुरांना एका महिन्याचा किराणा वाटणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच याअगोदरही बिग बींनी कोरोना विरोधातील लढाईसाठी पंतप्रधान फंडसाठी आर्थिक मदत दिली आहे.