सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया मसकली गाणं (Image Credit: Youtube)

बॉलिवुड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या 2009 मधील 'दिल्ली 6' (Delhi 6) चित्रपटातील 'मसकली' गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या गाण्यातील सोनमचा अंदाज सर्वांनाचा भारावून टाकणारा होता. परंतु, आता या गाण्याचे नवे व्हर्जन आले आहे. या नव्या व्हर्जनमध्ये बॉलिवुड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मंगळवारी या गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला. तसेच आज हे संपूर्ण गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 3 मिनिटांच्या या गाण्यात सिद्धार्थ आणि तारा सुतारियाचा रोमान्स पाहायला मिळत आहे.

'मसकली 2.0' (Maskali 2.0) हे नवे गाणं तनिष्क बागची यांनी कंपोज केलं आहे. तसेच तुलसी कुमार आणि सचेत टंडन यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याचं ऑरिजनल व्हर्जन एआर रहमान यांनी गायलं आहे. (हेही वाचा - कोरोना व्हायरस वरील शॉर्ट फिल्म मध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, प्रियंका चोप्रा यांच्या समवेत झळकणार अनेक सेलिब्रिटी; जाणून घ्या कुठे, कधी पाहाल ही फिल्म (Watch Video))

सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया यांची जोडी 'मरजावा' या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील सिद्धार्थ आणि तारा सुतारियाची जोडी आणि केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. आता मसकली या गाण्यातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिद्धार्थ आणि तारा सुतारियाचा रोमान्स पाहता येणार आहे.